केजरीवालांच्या रडारवर आता एचएसबीसी

अरविंद केजरीवालांच्या रडारवर आता एचएसबीसी बँक आली आहे. एचएसबीसी बँकेविरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 14, 2012, 02:02 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अरविंद केजरीवालांच्या रडारवर आता एचएसबीसी बँक आली आहे. एचएसबीसी बँकेविरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
दिल्लीतल्या बाराखंबा रोडवर एचएसबीसी बँकेचं मुख्यालय आहे. या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शनं केली. जिनिव्हा शाखेत 700 भारतीयांचा काळा पैसा असल्याचा गौप्यस्फोट केजरीवालांनी केला होता. त्यानंतर आता आयएसी रस्त्यावर उतरली आहे.
स्वीस बँकेत किती काळा पैसा आहे याबद्दल अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. सीबीआयचे विद्यमान संचालकांच्यामते सुमारे २५ लाख कोटी रुपये स्वीस बँकेत काळा पैसा म्हणून जमा आहे. अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये जिनिव्हाच्या एचएसबीसी शाखेत ७०० भारतीयांचे खाते आहेत. आमच्याकडे स्वीस बँकेतील सर्व खातेदारांची यादी असल्याचाही दावा केला होतै. यात दिवंगत धीरूभाई अंबानी यांचेही खाते असल्याचे सांगितले. स्वीस बँकेत खाते उघडणे खूप सोपे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते.