'हबल'मधून लागला नवीन आकाशगंगांचा शोध

विश्वाचा पसरा किती मोठा आहे याचा उलगडा करण्यासाठी गेली अनेक दशकं खगोल शास्त्रज्ञ जीवाचं रान करत आहेत... आणि आता या प्रयत्नांना यश येताना दिसतंय.

Updated: Oct 14, 2016, 10:03 AM IST
'हबल'मधून लागला नवीन आकाशगंगांचा शोध title=

मुंबई : विश्वाचा पसरा किती मोठा आहे याचा उलगडा करण्यासाठी गेली अनेक दशकं खगोल शास्त्रज्ञ जीवाचं रान करत आहेत... आणि आता या प्रयत्नांना यश येताना दिसतंय.

हबल अवकाश दुर्बिणीनं खोल अवकाशातून पाठवलेल्या थ्रीडी छायाचित्रांवरून विश्वात सध्या माहिती असणाऱ्या आकाशगंगांपेक्षा तब्बल २० अब्ज अधिक आकाशगंगा असल्याचं पुढे आलंय. 

गेली २० वर्ष हबल दुर्बिणीद्वारे आंकाशगंगांची संख्या मोजण्यासाठी छायाचित्रण सुरू होतं. या सर्व थ्रीडी छायाचित्राचा अभ्यास करून नुकताच एक प्रबंध अॅस्ट्रॉनोमिक जरनलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलाय.

सध्या अस्तित्वात असणाऱ्या तंत्रज्ञानानुसार आपल्याला फक्त विश्वाच्या पसाऱ्यापैंकी १० टक्के भागावर नजर ठेवता येते. ज्या भागातून पृथ्वी किंवा पृथ्वीच्या अवकाशात प्रकाश पोहचतो, त्याच भागात आपल्याला छायाचित्रांच्या आधारे संशोधन करता येतं. त्यामुळे आकाशगंगाविषयीची आपली माहिती मर्यादित होती.

हबल दुर्बिणीच्या माध्यमातून आलेल्या छायाचित्रांवरून आता खगोल तज्ज्ञांनी या अतिरिक्त आकाशगंगांची संख्या ताडलीय.

हबल दुर्बिण २४ एप्रिल १९९० मध्ये लॉन्च करण्यात आली होती. गेल्या २६ वर्षांत या दुर्बिणीमुळे आत्तापर्यंत अवकाशातील अनेक रहस्यांचा उलगडा व्हायला मदत झालीय.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x