हैदराबाद विद्यापीठात राडा, कुलगुरुंच्या लॉजमध्ये तोडफोड

आंध्र प्रदेशमधील हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांनी जोरदार गोंधळ घातलाय. विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या लॉजमध्ये तोडफोड केलीय.

Updated: Mar 22, 2016, 01:53 PM IST
हैदराबाद विद्यापीठात राडा, कुलगुरुंच्या लॉजमध्ये तोडफोड title=

हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांनी जोरदार गोंधळ घातलाय. विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या लॉजमध्ये तोडफोड केलीय.

हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरु अप्पाराव हे विद्यापीठात रजेनंतर पुन्हा रुजू झालेत. त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी आंदोलन करत होते.

मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर गेल्या दोन महिन्यांपासून आप्पाराव हे रजेवर गेले होते. ते आज हजर झालेत. त्यावेळी हे आंदोलन झाले.