देशात फसवणूक प्रकरणात ही बँक आघाडीवर

रिझर्व बँकेने गेल्या वर्षातील एप्रिल- डिसेंबर २०१६  या ९  महिन्यातील आकडेवारी  प्रसिद्ध केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 12, 2017, 10:25 PM IST
देशात फसवणूक प्रकरणात ही बँक आघाडीवर title=

नवी दिल्ली : बँकेच्या फसवणुकीच्या यादीत आयसीआयसीआय बँक अव्वल स्थानी आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर एसबीआय बँकेचा क्रमांक आहे. मात्र एसबीआय बँकेची व्याप्ती पाहता, तो आकडा आयसीआयसीआयच्या मानाने कमी आहे.

रिझर्व बँकेने गेल्या वर्षातील एप्रिल- डिसेंबर २०१६  या ९  महिन्यातील आकडेवारी  प्रसिद्ध केली आहे.

आयसीआयसीआय बँकेमध्ये  एप्रिल-डिसेंबर या ९ महिन्यांमध्ये  १  लाख रुपयाहून अधिकच्या रकमेसंदर्भातील ४५५ फसवणुकीची प्रकरणे आयसीआयसीआय बँकेत घडल्याचं समोर आलं. तर एसबीआय बँकेत हाच आकडा ४२९ इतका होता.
 
फसवणुकीची प्रकरणे
स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेत २४४
एचडीएफसी बँकेत २३७
अॅक्सिस बँकेत १८९
बँक ऑफ बडोदामध्ये १७६
सिटी बँकेत १५०

या बँक फसवणुकीच्या प्रकरणात सर्वात मोठी फसवणूक ही एसबीआय बँकेत झाल्याचं समोर आलं आहे. एसबीआय बँकेत तब्बल 2,236. 81 कोटीची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. तर पंजाब नॅशनल बँकेत 2250.34 कोटी रुपये, अॅक्सिस बँकेत 1,998.49 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं.

या प्रकरणी रिझर्व बँकेने अर्थ मंत्रालयाकडे जी आकडेवारी सादर केली आहे, त्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं म्हणलं आहे. फसवणुकीच्या घटनांमध्ये सर्वाधिक एसबीआय बँकेचे६४ कर्मचारी आहेत, तर एचडीएफसी बँकेचे ४९ आणि अॅक्सिस बँकेचे ३५ कर्मचारी सहभागी असल्याचं म्हणलं आहे.

याशिवाय एप्रिल-डिसेंबर २०१६ दरम्यान सरकारी आणि खासगी बँकांमधून तब्बल ४५०  बँक कर्मचारी असल्याचं समोर आलं आहे. या दरम्यान तब्बल १७,७५०.२७ कोटी रुपयांची एकूण ३८७० प्रकरणे नोंदवण्यात आली.