... तर भारतात काय घडलं असतं

कराची एअरपोर्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना विमानाचं अपहरण करण्यात यश आलं असतं तर भारतात हाहाकार माजला असता. कोणकोणती शहरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली असत पाहूया..

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 9, 2014, 09:48 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कराची एअरपोर्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना विमानाचं अपहरण करण्यात यश आलं असतं तर भारतात हाहाकार माजला असता. कोणकोणती शहरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली असत पाहूया..
पाकिस्तानच्या कराची एअरपोर्टवरील दहशतवादी हल्ल्यानंतर विमानाचं अपहरण करण्यात दहशतवादी यशस्वी झाले असते तर 9/11 हल्ल्याची दृष्यं पुन्हा एकदा पाहायला मिळाली असती. कदाचित या हल्ल्याचं टार्गेट भारतही असू शकतं.
दहशतवाद्यांचे मनसुबे स्पष्ट झाले नसले तरी अपहरण झालेलं विमानानं भारतात हाहाकार उडवला असता. कारण
 कराची ते मुंबई अंतर 884 किलोमीटर
 कराचीहून दिल्ली हे अंतर 1753 किलोमीटर
 कराची ते अहमदाबाद अंतर 600 किलोमीटर
यावरुन स्पष्ट होतंय की कराचीत दहशतवाद्यांना विमानाचं अपहरण करण्यात यश आलं असतं तर 9 जूनची सकाळ 9/11 प्रमाणेच विध्वंसकारी बातमी घेऊन आली असती.
कराची ते मुंबई हवाई अंतर जवळपास 884 किलोमीटर असून ते सुमारे एक तासात पार केलं जाऊ शकतं. याचाच अर्थ दहशतवादी मुंबईतल्या एखाद्या बड्या इमारतीवर या विमानानं हल्ला करु शकले असते. याशिवाय अपहरण केलेल्या विमानानं दिल्लीलाही टार्गेट करण्याचा डाव दहशतवाद्यांनी आखला असता कारण कराची-दिल्ली हे 1753 किमी अंतर 1 तास 50 मिनिटांत कापलं जाऊ शकतं.
रात्रीच्या वेळी दिल्लीतल्या एखाद्या बड्या इमारतीला या विमानानं धडक दिली असती. जर अपहरण केलेल्या विमानाला गुजरातच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न झाला असता तर दहशतवादी हल्ला अगदी कमी वेळात झाला असता. कारण कराची ते अहमदाबाद हे अंतर फक्त सहाशे किलोमीटर आहे. जे अंतर अवघ्या एक तासात पार करता येतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.