नवी दिल्ली: दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट (आयजीआय)वर काही दिवसांपासून संशयित ड्रोनसारखी वस्तू उडतांना दिसतेय. गेल्या आठवड्यात मंगळवारी संशयित 'ड्रोन' बघितल्याची घटना घडली होती. त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा तसंच घडलं. यामुळं दिल्ली विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार या घटनांनंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. सुरक्षा एजंसींना अज्ञात संशयित उडणारी वस्तू दिसल्यास त्यावर हल्ला करून मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृह मंत्रालयानं संपूर्ण एजंसींना याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत आणि अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर उत्तर मागितलंय. दरम्यान, याबाबत अजूनपर्यंत सबळ पुरावे न मिळाल्यानं अधिकाऱ्यांना शंका आहे.
एअरपोर्ट सूत्रांच्या मते, मंगळवारी ड्रोन दिसल्याच्या तीन दिवसांनंतर आयजीआय एअरपोर्टवर तीन वेळा संशयित वस्तू उडतांना दिसल्या... एअरपोर्ट रनवे नंबर २७जवळ ड्रोन सारखी वस्तू उडत होती. मात्र जेव्हा ते पाहायला गेलं ती वस्तू दिसली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.