दिल्ली IIT संचालकांच्या राजीनाम्याशी संबंध नाही- सचिन

दिल्ली आयआयटीचे संचालक रघुनाथ शेवगावकर यांनी त्यांचा दोन वर्षे कार्यकाल बाकी असताना राजीनामा दिलाय. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दबाव आणल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतंय. मॉरिशसमध्ये आयआयटीची संलग्न संस्था परवानगीविना सुरू केल्याचा आरोप त्यांच्यावर सरकारनं केला आणि स्पष्टीकरण मागितलं होतं, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलंय. 

Updated: Dec 29, 2014, 11:58 AM IST
दिल्ली IIT संचालकांच्या राजीनाम्याशी संबंध नाही- सचिन  title=

नवी दिल्ली: दिल्ली आयआयटीचे संचालक रघुनाथ शेवगावकर यांनी त्यांचा दोन वर्षे कार्यकाल बाकी असताना राजीनामा दिलाय. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दबाव आणल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतंय. मॉरिशसमध्ये आयआयटीची संलग्न संस्था परवानगीविना सुरू केल्याचा आरोप त्यांच्यावर सरकारनं केला आणि स्पष्टीकरण मागितलं होतं, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलंय. 

शेवगावकर यांनी त्यांचे राजीनामा पत्र आयआयटी मंडळाचे अध्यक्ष विजय भटकर यांना शुक्रवारी पाठवलं असून व्यक्तिगत कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलंय. दबाव आणल्यानं शेवगावकर यांनी राजीनामा दिल्याचा आरोप मनुष्यबळ विकास मंत्रालयानं फेटाळून लावलाय. शेवगावकर यांच्यावर दबाव आणल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाला निष्कारण त्यात ओढले आहे, असं मंत्रालयानं म्हटलंय.

दरम्यान या वादात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचंही नाव आलं होतं. या वृत्तावर सचिननं राग व्यक्त केलाय. आपल्या नावानं दिल्ली आयआयटीची जागा मागितल्याचं वृत्त आलंय. मात्र आपण अशी जागा मागितली नसल्याचं स्पष्टीकरण सचिननं दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.