नवऱ्यामुलाला गणिताचे उत्तर देता नाही आल्याने वधूचा लग्नांला नकार

लग्न मोडण्याची अनेक कारणे तुम्हाला माहित असतील परंतु गणिताचे उत्तर देऊ न शकल्याने कधी लग्नं मोडलेल ऐकलं आहे का? हो पण हे खर आहे. मनाली शिमला उत्तर प्रदेशमधील मिनपुरीत जेव्हा एका वराला वधुने लग्नमंडपात गणिताचे काही प्रश्न विचारले आणि नवरामुलगा त्या प्रश्नाचे उत्तर न दिल्याने वधूने लग्न मोडलंय.

Updated: Dec 13, 2015, 01:23 PM IST
नवऱ्यामुलाला गणिताचे उत्तर देता नाही आल्याने वधूचा लग्नांला नकार title=

मिनपुरी : लग्न मोडण्याची अनेक कारणे तुम्हाला माहित असतील परंतु गणिताचे उत्तर देऊ न शकल्याने कधी लग्नं मोडलेल ऐकलं आहे का? हो पण हे खर आहे. मनाली शिमला उत्तर प्रदेशमधील मिनपुरीत जेव्हा एका वराला वधुने लग्नमंडपात गणिताचे काही प्रश्न विचारले आणि नवरामुलगा त्या प्रश्नाचे उत्तर न दिल्याने वधूने लग्न मोडलंय.

मिनपुरी तालुक्यातील गुलरियापूर गावातील खुशबूचा विवाह ओमवीर सोबत होणार होता दोघेंही लग्नासाठी उपस्थितही झाले. मात्र जेव्हा नवरामुलगा लग्नातीलमंत्र बोलताना अडखळू लागला तेव्हा खुशबुने ओमवीरची आयक्यू टेस्ट घेण्याचे ठरवले. ओमवीरला खुशबूने काही पैसे मोजण्यास सांगितले तेव्हा तो फक्त नऊपर्यतच मोजू शकला. त्याच्या पुढे त्याला मोजता येत नव्हते. खुशबूने नंतर तिचा फोन नंबर डायल करायला सांगितला ते ही तो करू शकला नाही. यामुळेच खुशबूने ओमवीर हा मानसिक रोगी आहे त्यामुळे हे लग्न करू शकत नसल्याचे सांगितले.

ओमवीरच्या घरच्यांनी खुशबूला खुप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच नाहीच झाले. शेवटी हा विषय गावातील पंचायतीला कळवण्यात आला. पंचायतीमध्ये देखील खुशबूने लग्नांस नकार दिला. खुशबूच्या निर्णयानंतर शेवटी ओमवीरच्या घरच्यांनी माफी मागितली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.