नवी दिल्ली : इसिस ( ISIS) अर्थात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे देशात जाळे पसरत आहे. देशाभरातून १४ संशियाता अटक करण्यात आलेय. यात मुंबई, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील तरुणांचा समावेश आहे.
इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करीत असल्याच्या संशयावरून ठाणे जवळील मुंब्र्यातून गुरुवारी रात्री एका तरुणाला अटक करण्यात आली. ठाण्यातील दहशतवाविरोधी पथकाने ही कारवाई केली. त्याला एनआयएच्या ताब्यात देण्यात आलेय.
इसिससाठी काम करणाऱ्या सहा जणांना कर्नाटकातून, चौघांना हैदराबादमधून आणि दोघांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच मालवणीमधील तीन युवक इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी एक जण सीरियाला गेल्याचीही माहिती होती. इतर दोन जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली होती. मात्र, नंतर त्यांना सोडण्यात आले.