'इसिस'च्या आणखी एका संशयिताला अटक, हा मुंबईतल्या हवाला ऑपरेटर?

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (आयएसआयएस) निगडीत आणखी एका संशयिताला गुरुवारी रात्री दिल्लीत अटक करण्यात आलीय. 

Updated: Feb 5, 2016, 02:07 PM IST
'इसिस'च्या आणखी एका संशयिताला अटक, हा मुंबईतल्या हवाला ऑपरेटर? title=

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (आयएसआयएस) निगडीत आणखी एका संशयिताला गुरुवारी रात्री दिल्लीत अटक करण्यात आलीय. 

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केलीय. संशयित दहशतवादी मोहसिन दिल्लीहून रोहतक जाण्याच्या तयारीत होता. तो मुंबईच्या मालाडचा रहिवासी आहे. त्याच्याकडून ८,५०,००० रुपये रोकड जप्त करण्यात आलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, 'आयएसआयएस'शी संबंध असलेल्या २८ वर्षीय मोहसिनला दिल्ली पोलिसांनी काश्मीरी गेट आयएसबीटीहून अटक केलीय. गेल्या महिन्यापासून अटक करण्यात आलेला मोहसिन हा पाचवा संशयित आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, मोहसिन सीरियाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. अगोदर पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांसोबत त्याचे संबंध असल्याचं समजतंय. तो या दहशतवाद्यांचा भारतातील हॅन्डलर असल्याचंही म्हटलं जातंय. मोहसिननं उत्तराखंडातील रुडकीहून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना हल्ल्यासाठी पैसे दिल्याचाही आरोप आहे. तो इसिसचा मुंबईतील हवाला ऑपरेटर आहे का? याबद्दल सध्या चौकशी सुरू आहे.