श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं संध्याकाळी सहा वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.
श्रीहरिकोटावरून PSLV C29 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं ही मोहिम पार पाडली. यामध्ये TeLEOS - 1 हा सिंगापुरचा पहिला पृथ्वीचे निरीक्षण करणारा 400 किलो वजनाचा उपग्रह आहे. तर 123 किलो , 78 किलो , 13 किलो, 3.5 किलो आणि एक किलो असे इतर पाच छोटे उपग्रह आहेत.
आतापर्यंत इस्रोने 51 परदेशी उपग्रह PSLV च्या माध्यमातून अवकाशात पाठवले आहेत. या मोहिमेनंतर इस्त्रोनं लॉन्च केलेल्या विदेशी उपग्रहांची संख्या 57 झालीय. PSLV प्रक्षेपकाची ही सलग 29 वी यशस्वी मोहिम ठरलीय.