जयललिता यांचा अल्प परिचय

 जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे   तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले. 

Updated: Dec 6, 2016, 12:18 AM IST
जयललिता यांचा अल्प परिचय  title=

चेन्नई :  जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे   तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले. 

त्यानंतर जयललिता यांचा भाऊ जयकुमार आणि आई बंगळुरू येथे स्थायिक झाल्या. 

जयललिता यांची आई वेदवती यांनी तमिळ सिनेमात संध्या नावाने काम करण्यास सुरूवात केली.  जय नावाचा अर्थ विजयी असा होता. त्यामुळे त्याचे वडील, भाऊ आणि त्यांच्या स्वतःच्या नावात जयचा वापर करण्यात आला आहे. 

जयललिता यांच्या कुटुंबाचा म्हैसूरच्या वोडेयार या शाही कुटुंबाशी होता. १८८० ते १९२० या काळात जयललिता यांचे आजोबा म्हैसूर राजघराण्याचे खासगी शैल्य विषारद होते. 

- जयललिया यांनी आपले शालेय शिक्षण चैन्नईतील बिशप कॉटन गर्ल्स आणि चर्चपार्क कॉन्वेन्ट येथे झाले. 

- जयललिता यांनी भारतनाट्यम् शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांना कथ्थक, मोहिनी अट्टम आणि मणीपुरी हे नृत्यप्रकारही येत होते. 

- जयललिता यांनी आपल्या काही चित्रपटात गाणेही गायली आहेत. 

- जयललिता यांना इंग्लिश, हिंदी, तमिळ, कन्नड, तेलगु आणि मल्याळम भाषा बोलता येतात. 

- जयललिता यांचा भाऊ जयकुमार १९९०च्या दशकात कालावश झाले. 

- जयललिता या अविवाहीत आहेत. 

 

राजकारणातील जयललिता 

- जयललिता यांनी १८८२ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांनी स्थापन केलेल्या   एआयएडीएमके पक्षाचे सदस्यत्व घेतले.  येथूनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 

- त्यांनी आपले पहिले सार्वजनिक भाषण महिला सन्मानाविषयी  पक्षाच्या सभेत १९८२ मध्ये केले. 

- त्यांना १९८३मध्ये एआयएडीएमकेच्या प्रॉपगेंटा सेक्रेटरी म्हणून नियुक्त करण्यात आले. 

- जयललिता यांनी १९८३मध्ये पहिली प्रचार सभा घेतली. तिरूचेंदूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक त्यांनी लढवली. 

- जयललिता यांची १९८४ मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या १९८९मध्ये राज्यसभा सदस्य निवृत्ती घेतली. 

- १९८४ मध्ये एम. जी. आर आजारी पडले आणि अमेरिकेत ट्रिंटमेंटसाठी गेले. त्यामुळे पक्षाची सर्व धुरा जयललिता यांच्यावर आली. त्यांनी १९८४मध्ये लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक लढवली. काँग्रेस आय आणि एआयएडीएमकेच्या युतीने मोठा विजय मिळविला. 

- एम.जी.आर यांचे १९८७ला निधन झाले. आणि एआयएडीएमके दोन भागात विभागली गेली. त्यानंतर दोन पाने हे पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने रद्द केले. 

- जयललिता या १९८९ मध्ये बोडीनायककन्नूर मतदार संघातून तामिळनाडू विधानसभेत निवडून गेल्या 

- तामिळनाडू विधानसभेत जयललिता या पहिल्या महिला विरोधी पक्ष नेत्या होत्या. 

- फेब्रुवारी १९८९मध्ये जयललिता यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे दोन गट एकत्र आले. त्यांची एआयएडीएमकेच्या महासचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. 

- एआयएडीएमकेचे दोन पानांचे निवडणूक चिन्ह पुन्हा १९८९मध्य पक्षाला मिळाले. 

- १९८९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आय आणि एआयएडीएमकेच्या युतीने तामिळनाडू आणि पुद्दूचेरी मध्ये जबरदस्त यश मिळविले. 

- यानंतर १९९१ मध्ये जयललिता यांच्या नेतृत्वाखाली मित्रपक्षासह एआयएडीएमकेने २३४ पैकी २२५ जागांवर विजय मिळवून त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात आपली छाप सोडली. यावेळी त्या दोन ठिकाणाहून विजयी झाल्या होत्या. 

- २४ जून १९९१ मध्ये त्या सर्वात तरूण आणि तामिळनाडूच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविला. त्यांनी १२ मे १९९६पर्यंत हा पदभार स्वीकारला. 

- १९९१मध्ये एआयएडीएमकने आणि काँग्रेसच्या युतीने पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या ४० जागा पटकावून विक्रम केला होता. 

२००१ च्या तामिळनाडू विधानसभेत जयललिता यांनी आपल्या मित्रपक्षांसह १९५ जागांवर विजय मिळवला त्यातील एआयएडीएमकने १३२ जागा पटकावल्या.  

- १४ मे २००१ रोजी जयललिता दुसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्या २१ सप्टेंबर २००१ पर्यंत राहिल्या. 

- फेब्रुवारी २००२मध्ये त्या अन्डीपट्टी येथून निवडून आल्या. त्यानंतर त्या २ मार्च २००२ ते १२ मे २००६ पर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. 

- पण नंतर २००६ झालेल्या निवडणुकीत पराभव झाला. त्यांना फक्त ६९ जागांवर समाधान मानावे लागले. त्या पुन्हा विरोधीपक्ष नेत्या म्हणून निवडण्यात आल्या. 

- २०११मध्ये पुन्हा एआयएडीएमके आणि मित्रपक्षांनी तामिळनाडूतील २३४ जागांपैकी २०३ जागा मिळवून विधानसभेवर विजय मिळविला. त्यात एआयडीएमकेने १५० जागा जिंकल्या. १६ मे २०११ रोजी जयललिता चौथ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्यात. 

- २०१४मध्ये जयललिता यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती ठेवल्या प्रकरणी १८ वर्षापूर्वींच्या खटल्यात सत्र न्यायालयाने दोषी ठरविल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. ६६.६५ कोटींची संपत्ती बाळगल्याचा हे प्रकरण होते. त्यांना न्यायालयाने ४ वर्षांचा तुरूंगवास १०० कोटींचा दंड ठोठावण्यात आला. पण त्यांनी या प्रकरणाला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले. 

- ११ मे २०१५ रोजी कर्नाटक हायकोर्टाने जयललिता यांना निर्दोष मुक्त केले. 

- त्यानंतर त्यांनी २३ मे २०१५ रोजी पुन्हा पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

- २५ एप्रिल २०१६ रोजी त्यांनी आर. के. नगर येथून तामिळनाडू विधानसभेची निवडणूक लढविली. 

- १९८९नंतर दोनवेळा सलग निवडणूक जिंकल्याचा इतिहास जयललिता यांनी रचला. 

- त्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून विक्रमी सहा वेळा शपथ २३ मे २०१६ रोजी घेतली.