मुंबई : राहुल गांधींना राष्ट्रगीत म्हणताना ऐकायचं आहे. राहुल गांधींना खरंच राष्ट्रगीत येतं का हे पाहायचं आहे, असा टोला बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी लगावला आहे. राहुल गांधींच्या भारतीयत्वावर मला कोणताच आक्षेप नसल्याचंही अनुपम खेर म्हणाले आहेत.
चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये अनुपम खेर यांची भर पडली आहे.
नोटबंदीच्या निर्णयावरही अनुपम खेर यांनी भाष्य केलं आहे. नागरिकांना यामुळे त्रास होत असेल तर त्यांच्याकडे 2019च्या निवडणुकांमध्ये बदल करण्याची संधी आहे. पाच वर्ष मोदींनी काम करू देत. जर कोणी देशासाठी चांगल्या गोष्टी करत असेल तर आपण त्यांची अडवणूक न करण्याचंही अनुपम खेर म्हणालेत.