जम्मूत पावसाचा हाहाकार, 9 जवान वाहून गेलेत

 जम्मू-काश्मीरमध्ये पुराचा कहर सुरूच असून आता मृतांचा आकडा शंभरावर पोहोचलाय. लष्करानं बचावकार्यात 7 हजार जवान पाठवले असून त्यांनी आतापर्यंत 6 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. पुलवामा जिल्ह्यात 9 जवान वाहून गेलेत. तर  वैष्णोदेवीचे 10 हजार भाविक अडकलेत.

Updated: Sep 6, 2014, 03:36 PM IST
जम्मूत पावसाचा हाहाकार, 9 जवान वाहून गेलेत title=

कटरा : जम्मू-काश्मीरमध्ये पुराचा कहर सुरूच असून आता मृतांचा आकडा शंभरावर पोहोचलाय. लष्करानं बचावकार्यात 7 हजार जवान पाठवले असून त्यांनी आतापर्यंत 6 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. पुलवामा जिल्ह्यात 9 जवान वाहून गेलेत. तर  वैष्णोदेवीचे 10 हजार भाविक अडकलेत.

पुरवामा जिल्ह्यात पुराचा वेढा आहे. बचावकार्य करताना 9 जवान या पुरात वाहून गेलेत. तर कटरा येथे  वैष्णोदेवीचे 10 हजारभाविक अडकले आहेत. येथे मुसळधार पाऊस कोसळत अल्याने पुराची  भीती कायम आहे. पुरामुळे लष्कराच्या छावण्या तसंच पाकिस्तानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कुंपणाचं नुकसान झालंय. असं असताना जीवावर उदार होऊन जवान बचावकार्यात झोकून देतायत.

आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा कहर सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. दरम्यान राज्याच्या दौ-यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज पुराची हवाई पाहणी करणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.