जया बच्चन यांनी खाल्ले गाय आणि डुकराचे मांस, अमरसिंह यांचा दावा

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे कधीकाळी निकटवर्तीय असलेले अमरसिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जया बच्चन यांनी गाय आणि डुकराचे मांस खाल्ले असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

Updated: Oct 14, 2015, 09:35 AM IST
जया बच्चन यांनी खाल्ले गाय आणि डुकराचे मांस, अमरसिंह यांचा दावा title=

वाराणसी : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे कधीकाळी निकटवर्तीय असलेले अमरसिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जया बच्चन यांनी गाय आणि डुकराचे मांस खाल्ले असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

अमरसिंह चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्यासोबत विंध्याचल मंदिरात दर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी ते म्हणाले, की कोण काय खातं आणि काय परिधान करतं यावर भांडण किंवा हत्या व्हायला नको. भारताचे एक प्रतिनिधी मंडळ ग्लासगोला गेले होते. त्यात जया बच्चन होत्या. तेव्हा सर्वांनी गाय आणि डुकराचे मांस खाल्ले होते. युकेसाठी ते गाय आणि डुक्कर नाही तर बीफ आणि पोर्क आहे. यावर आमचे भांडण झाले. पण आम्ही कुणाची हत्या केली नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला काहीही खाण्याचा अधिकार आहे.

बच्चन परिवाराशी बिनसलं
कधी काळी अमरसिंह अमिताभ आणि जया बच्चन यांचे निकटवर्तीय होते. पण आता त्यांच्या संबंधांमध्ये प्रचंड कटूता आली आहे. आता अमरसिंह अमिताभ यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतात. यावर्षी मे महिन्यात एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमरसिंह म्हणाले होते, की अमिताभ 'बागबान' चित्रपटातील भूमिकेसारखे नाही. ते 'बाग उजाड' अशा विचारांचे आहेत.

इंग्रजी वृत्तपत्रातील मुलाखतीत काय होते
अमरसिंह म्हणाले, की सहारा बोर्डमधून माझ्या कुटुंबीयांना अमरसिंह यांच्यामुळे काढण्यात आले असा आरोप अमिताभ यांनी अनिल अंबानी यांच्या घरी माझ्यावर लावला होता. तेव्हापासून आमचे संबंध खराब झाले आहेत. पण मी तेव्हा अमिताभ यांना सुचविले होते, की तुम्ही अशा कारमध्ये बसू नका ज्याचा ड्रायव्हर कोण आहे याची माहिती नाही. जर बच्चन कुटुंबीय आता सहाराच्या बोर्डवर असते तर त्यांनाही तुरुंगवास झाला असता. त्यांना मोदींसोबत सेल्फी घेता आले नसते. गीरच्या जंगलातील सिंहांची जाहिरात करता आली नसती. उलट अमिताभ यांनी ७० व्या वाढदिवसाला मला बोलविले नाही. स्पॉट बॉयला बोलविले. पण मला डावलले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.