नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्ररप्रांतियांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत, तरी देखील महाराष्ट्र सरकार कोणतीही कारवाई करायला धजावत नसल्याचं वक्तव्य, जेडीयू नेत्यांनी केली आहे.
जेडीयूचे नेते के.सी. त्यागी यांनी म्हटले की, 'राज ठाकरे निवडणुकांतील पराभवामुळेच निराश झालेले आहेत, ते आता गरीब उत्तर भारतीयांविरूद्ध वक्तव्य करत आहेत, मात्र महाराष्ट्र सरकारने मौन धारण केल्याचं त्यांनी म्हटलंय
मराठी तरुणांवर हा अन्याय होत आहे, नवीन रिक्षा दिसल्यास जाळून टाका, असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. परिवहन विभागातर्फे देण्यात येत असलेले 70 हजार रिक्षा परवाने राहुल बजाज यांच्या रिक्षांच्या विक्रीच्या लाभासाठी देण्यात येत आहेत.
हे परवाने देताना मराठी तरुणांना डावलण्यात येत आहे. 70 टक्के परवाने परप्रांतीय तरुणांना देण्यात आले आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.