जितेंद्र सिंह जम्मू-काश्मीरचे पहिले हिंदू मुख्यमंत्री होणार?

जम्मू काश्मीरमध्ये भाजप सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. भाजप विधीमंडळ गटनेतेपदी जितेंद्र सिंग यांची निवड होण्याची चिन्हं आहेत. जितेंद्र सिंग हे सध्या केंद्रात मंत्री आहेत. 

Updated: Dec 26, 2014, 09:25 AM IST
जितेंद्र सिंह जम्मू-काश्मीरचे पहिले हिंदू मुख्यमंत्री होणार? title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये भाजप सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. भाजप विधीमंडळ गटनेतेपदी जितेंद्र सिंग यांची निवड होण्याची चिन्हं आहेत. जितेंद्र सिंग हे सध्या केंद्रात मंत्री आहेत. 

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपनं चांगलं प्रदर्शन करत २५ जागांवर ताबा मिळवलाय. यानंतर सूत्रांच्या माहितीनुसार, नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीनं भाजप सरकार बनवण्याच्या प्रयत्नात आहे. जितेंद्र सिंह यांचं यांचं नाव चर्चेत असलं तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी रात्री ट्विट करून सरकार बनविण्यासाठी भाजपशी कोणतीही डील झाल्याच्या वृत्ताला नकार दिलाय. 

भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र आले तर राज्याला जितेंद्र सिंह यांच्या रुपात पहिला हिंदू मुख्यमंत्री मिळू शकतो. ५८ वर्षीय जितेंद्र सिंह हे व्यावसयानं डॉक्टर आहेत. उधमपूरहून ते भाजपचे खासदार आहेत. भाजपचे जम्मू-काश्मीर प्रभारी राम माधव शुक्रवारी जम्मूला जाणार आहेत. जम्मूत शुक्रवारी भाजप विधीमंडळ गटनेतेपदाच्या नेत्याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये समर्थनाच्या बदल्यात नॅशनल कॉन्फरन्सला केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार असल्याचंही समजतंय. 

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपकडं उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचं समजतंय... त्याशिवाय ४ कॅबिनेट मंत्रीपदांसाठी देखील ते आग्रही असल्याचे कळतंय.  

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेमध्ये भाजप महत्त्वाची भूमिका बजावेल, असं अरूण जेटली यांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची  अरूण जेटलींनी भेट घेतली. सरकार स्थापनेबाबत जम्मू काश्मीरमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र सरकार स्थापनेचे सर्वाधिकार भाजपने अमित शाह यांना बहाल केले आहेत.  याशिवाय काही अपक्षांसोबतही भाजपची चर्चा सुरू आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.