जम्मूत भूस्खलनात वैष्णोदेवीच्या चार भाविकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर मधील वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भूस्खलनात चार भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत.

PTI | Updated: Aug 6, 2016, 09:35 PM IST
जम्मूत भूस्खलनात वैष्णोदेवीच्या चार भाविकांचा मृत्यू  title=

जम्मू : जम्मू-काश्मीर मधील वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भूस्खलनात चार भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत.

मंदिरापासून सहा किलोमीटर अंतरारव असलेल्या अर्धकुमारी गुहेजवळ ही दुर्घटना घडलीये. यातील मृतांची नावं अद्याप कळू शकलेली नाहीत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका भाविकाची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींवर कटरा येथील स्थानीक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काश्मीरच्या काही भागात संचारबंदी कायम

Kashmir unrest: Fresh clashes break out in Anantnag, Shopian; curfew clamped in many parts of Valley

हजरतबाल दर्ग्यापर्यंत फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरच्या काही भागात आजही संचारबंदी कायम आहे.. त्यामुळे काश्मीर खो-यातील जनजीवन सलग 29व्या दिवशी विस्कळीत झाले आहे. 

पोलिस आणि अधिका-यांच्या मते गंदरबल, बडगाम, अनंतनाग, अवंतीपुरा, कुलगाम, सोपौर वगळता बारामुल्ला जिल्हा, शोपियॉ, बंदिपुराच्या काळूसा, हंडवाडा भागात संचारबंदी लागू करण्यात आलीये. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक भागात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. तसेच संवेदनशिल भागात सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली.