चिल्लाई कालान आधीच काश्मीर गारठलं

चिल्लाई कालानच्या आदल्याच दिवशी काश्मीरवासी गारठलेत. यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद काल रात्री झाली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 21, 2016, 11:42 AM IST
चिल्लाई कालान आधीच काश्मीर गारठलं title=

श्रीनगर : यंदाची थंडीची लाट आता आधिक गहरी झाली आहे. उद्यापासून काश्मीरमधला कडाक्याच्या थंडीचा चिल्लाई कालान नावानं ओळखला जाणारा ४० दिवसांचा काळ सुरू होत आहे.

मात्र चिल्लाई कालानच्या आदल्याच दिवशी काश्मीरवासी गारठलेत. यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद काल रात्री झाली. 

राज्याची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये उणे 5.5 अंश सेल्सियल्स तापमानाची नोंद झाली आहे. पारा शुन्याच्या खाली गेल्यामुळे दल लेक गोठायला सुरूवात झाली. काश्मीर खोऱ्यातल्या पाणीपुरवठ्यालाही फटका बसलाय.