गाय, दूध आणि मत यावर लालू मोदींना म्हणाले...

लालूप्रसाद यादव यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे, 'गाय ही दूध देते,  मात्र मत देत नाही, 'हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राजदचे  नेते  लगावला आहे.

Updated: Aug 8, 2016, 11:30 PM IST
गाय, दूध आणि मत यावर लालू मोदींना म्हणाले... title=

पाटणा : लालूप्रसाद यादव यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे, 'गाय ही दूध देते,  मात्र मत देत नाही, 'हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राजदचे  नेते  लगावला आहे.

बिहारमध्येही भाजपकडून गायीसंदर्भात चुकीचा प्रचार करण्यात आला, मात्र बिहारने हा प्रचार फेटाळून लावत धर्मनिरपेक्ष सरकारची निवड केल्याचे मतही यादव यांनी यावेळी व्यक्‍त केले. तेव्हा गोमाता यांचे सरकार बनविणे तर दूर राहिले, याआधीच स्थापन करण्यात आलेल्या सरकारांना धक्‍के देत आहे, अशी टीका लालू यादव यांनी केली आहे.

लालूंचं टवीट
लालूंनी यावर टवीट करताना म्हटलं आहे,  'गोमाता दूध देते, मत नाही. मात्र यांना असे वाटते की गोमाता मत देते, यांनी कधी गायी पाळल्याच नाहीत, तर यांना तरी काय माहिती असणार?,  अशी उपरोधिक टीका त्यांनी या ट्‌विटच्या माध्यमामधून केली होती.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांसंदर्भात केलेले विधान हा सत्याचा विजय आणि असत्याचा पराभव असल्याची प्रतिक्रिया यादव यांनी व्यक्‍त केली. 'गाय ही मत देत नाही, हे मी याआधी व्यक्‍त केलेले मत आता मोदींना चांगल्या पद्धतीने समजले दिसते,' असं लालूंनी म्हटलंय.