भरदिवसा अमरेली शहरात घुसला जंगलचा राजा

गुजरातच्या अमरेली शहरात अचानक लोकांची धावपळ झाली.. भर दिवसा शहरात अचानक सिंहाचं आगमन झालं. 

Updated: Dec 19, 2016, 08:34 AM IST
भरदिवसा अमरेली शहरात घुसला जंगलचा राजा title=

अमरेली : गुजरातच्या अमरेली शहरात अचानक लोकांची धावपळ झाली.. भर दिवसा शहरात अचानक सिंहाचं आगमन झालं. 

जंगलातून वाट चूकलेला हा सिंह सरळ शहरात आला आणि रस्त्यावर फिरु लागला. 

अमरेली शहर हे गीर अभयारण्याजवळच आहे त्यामुळे अनेकदा वन्यजीव शहरात आल्याच्या घटना घडतात मात्र अचानक जंगलाचा राजाच शहरात आल्यानं शहरात दहशतीचं वातावरण आहे.