सिहाचं आख्ख कुटुंब हायवेवर आलं आणि...

 गुजरातमधील पिपावाव-राजुला महामार्ग म्हणजे सतत वर्दळीचा रस्ता..  गाड्यांची वेगवान वाहतूक सतत या महामार्गावर सुरु असते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 16, 2017, 02:34 PM IST
सिहाचं आख्ख कुटुंब हायवेवर आलं आणि... title=

पिपावाव : गुजरातमधील पिपावाव-राजुला महामार्ग म्हणजे सतत वर्दळीचा रस्ता..  गाड्यांची वेगवान वाहतूक सतत या महामार्गावर सुरु असते.

 मात्र काल रात्री या महामार्गावरची वाहतूक अचानक काही काळासाठी ठप्प झाली.. कारण रात्रीच्या अंधारात या महामार्गावर सिंहाचं एक कुटुंब अगदी आरामात भटकत होतं.

 डझनभर सिंह रस्त्यावर मुक्तपणे हिंडताना पाहून वाहनचालकांनी गाड्या थांबवल्या.. या सिंहांचं व्हिडियोशुटींग घेण्यासाठी बाईकस्वारही पुढे येऊ लागले.

मात्र त्याची या सिंहांच्या या टोळक्याला फिकीर नव्हती.. ज्या दिमाखात हे कुटुंबर रस्त्यावर आलं त्याच दिमाखात रस्ता पार करुन जंगलात पुन्हा नाहीसं झालं.. या भागात सिंहांचं दर्शन नेहमीच होतं..

 पण सिंहांचं आख्ख कुटुंब पहाण्याचा योग प्रवाशांना प्रथमच आला.. सिंहांचं हे टोळकं रस्ता ओलांडून गेल्यानंतर हळूहळू महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली.