गॅस सिलेंडर ११३ रूपयांनी स्वस्त होणार

गॅस सिलेंडरची किंमत ११३ रूपयांनी कमी होणार आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही कपात होणार असल्याचं सांगितलं जातंय.

Updated: Dec 1, 2014, 04:43 PM IST
गॅस सिलेंडर ११३ रूपयांनी स्वस्त होणार title=

मुंबई : गॅस सिलेंडरची किंमत ११३ रूपयांनी कमी होणार आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही कपात होणार असल्याचं सांगितलं जातंय.

आंतरराष्ट्रीय बाजारात जेट फ्यूअलची किंमत ४.१ टक्क्याने कमी झाल्याने सिलेंडरची किंमत कमी झाली आहे.

विनाअनुदानित सिलेंडरची किंमत आता ७५२ रूपयांवर येणार आहे, यापूर्वी या सिलेंडरची किंमत ८६५ रूपये होती.

सिलेंडरची किंमत एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने एलपीजी गॅस धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही पैशांनी दरकपात झाली असली तरी सिलेंडरच्या किंमतीत ११३ रूपयांनी कपात होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.