मुंबई : आयएनएस चेन्नई ही कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. स्टेल्थ रचनेची ही युद्धनौका मुंबईच्या नौदल तळावरून भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणासाठी रुजू झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
आयएनएस चेन्नईचं वजन साडेसात हजार टन आहे. गुजरातच्या किनाऱ्यावरून पाकिस्तानच्या कुठल्याही शहरावर सहज मारा करता येईल अशी ब्रम्होस जातीची क्रूझ क्षेपणास्त्र या नौकेवर तैनात आहेत. शिवाय नौकेची रचना स्टेल्थ स्वरुपाची असल्यानं ही युद्धनौका शत्रूच्या रडारवर दिसत नाही. शत्रूनं मारलेल्या क्षेपणास्त्रांना चुकवणारी कवच ही विशेष प्रणाली देखील या युद्धनौकेचं वैशिष्ट्य आहे.
#INSChennai वर शत्रुपक्षाच्या क्षेपणास्त्राला चकवा देणारी कवच यंत्रणा. युद्धनौकेची बांधणी माझगांव डॉकने केली pic.twitter.com/ylRxBU0Lsm
— अमित जोशी (@amitjoshitrek) November 21, 2016
#INSChennai 300 किमी पर्यन्त मारा करणारे ब्रम्होस कृझ क्षेपणास्त्र,शत्रु पक्षाला रडारवर दिसणार नाही अशी स्टेल्थ रचनाpic.twitter.com/5UHoLTQupL
— अमित जोशी (@amitjoshitrek) November 21, 2016
#INSChennai , कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. युद्धनौकेचे 7500 टन वजन.... pic.twitter.com/Vu4grzoGpA
— अमित जोशी (@amitjoshitrek) November 21, 2016
.....300 किमी पर्यन्त मारा करणारे ब्रम्होस कृझ क्षेपणास्त्र, शत्रु पक्षाला रडारवर दिसणार नाही अशी युद्धनौकेची स्टेल्थ रचना..... pic.twitter.com/5UHoLTQupL
— अमित जोशी (@amitjoshitrek) November 21, 2016
......शत्रुपक्षाच्या क्षेपणास्त्राला चकवा देणारी " कवच " यंत्रणा अशी युद्धनौकेची वैशिष्टये. युद्धनौकेची बांधणी माझगांव डॉकने केली आहे. pic.twitter.com/ylRxBU0Lsm
— अमित जोशी (@amitjoshitrek) November 21, 2016
INS Chennai, कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. युद्धनौकेचे 7500 टन वजन.... pic.twitter.com/Vu4grzoGpA
— अमित जोशी (@amitjoshitrek) November 21, 2016