मध्यप्रदेशच्या आमदारांसाठी खूशखबर, दुप्पट होणार पगार?

मध्यप्रदेश विधानसभेचं बजेट सत्र संपल्यानंतर आमदारांना एक खूशखबरी मिळाली आहे. आमदारांच्या पगारीमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. आमदारांच्या पगार वाढीचा प्रस्ताव कॅबिनेटने मंजूर केला आहे.

Updated: Mar 30, 2016, 05:11 PM IST
मध्यप्रदेशच्या आमदारांसाठी खूशखबर, दुप्पट होणार पगार? title=

नवी दिल्ली : मध्यप्रदेश विधानसभेचं बजेट सत्र संपल्यानंतर आमदारांना एक खूशखबरी मिळाली आहे. आमदारांच्या पगारीमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. आमदारांच्या पगार वाढीचा प्रस्ताव कॅबिनेटने मंजूर केला आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंग यांनी ५० टक्के पगारवाढीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता आमदारांचा पगार हा ७१००० हजार वरून १ लाख १० हजार होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा पगार हा १.४३ लाख वरुन २ लाख झाला आहे. तर राज्यातील मंत्र्यांचा पगार हा १.३ लाखांवरुन १.५० लाख होणार आहे.