८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात

आपल्या केवळ आठ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला चिमुरडीच्या बापानं चांगलाच धडा शिकवलाय... त्यांनी आरोपीचे दोन्ही हातच छाटून टाकले... या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय.   

Updated: Apr 20, 2016, 11:29 AM IST
८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात title=

चंदीगड : आपल्या केवळ आठ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला चिमुरडीच्या बापानं चांगलाच धडा शिकवलाय... त्यांनी आरोपीचे दोन्ही हातच छाटून टाकले... या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय.   

पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यात ही भयंकर घटना घडलीय. अल्पवयीन (१७ वर्षीय) आरोपीनं केवळ ८ महिन्यांच्या एका चिमुरडीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. एप्रिल २०१४ मध्ये कोटली अबलू गावात ही घटना घडली होती.

भटिंडा जिल्हा कोर्टात याबद्दल सुनावणी सुरू आहे. सुनावणी संपल्यानंतर घरी परतत असताना पिडीत मुलीच्या वडिलांनी आरोपी तरुणाला दुचाकीवरुन आपल्यासोबत येण्यास सांगितले. हे प्रकरण मिटवण्यासाठी तडजोडीची चर्चा करायची असल्याचं त्याला सांगितलं. झुंबा गावाजवळ पोहोताच पिडीत मुलीच्या वडिलांनी आरोपी तरुणाला झाडाला बांधलं आणि धारदार शस्त्राने त्याचे दोन्ही हात कापून टाकले. 
 
आरोपी तरुणाला भटींडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या शरिरावर इतर ठिकाणीही जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास करत आहेत.