'या' दिवशी ओटीटीवर पाहू शकता 'द साबरमती रिपोर्ट'चा प्रीमियर, जाणून घ्या सविस्तर

विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी  नुकतीच रिलीज डेट जाहीर केली आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 8, 2025, 02:12 PM IST
'या' दिवशी ओटीटीवर पाहू शकता 'द साबरमती रिपोर्ट'चा प्रीमियर, जाणून घ्या सविस्तर  title=

The Sabarmati Report OTT : ZEE5 ने 'द साबरमती रिपोर्ट' या प्रखर राजकीय नाट्य असलेल्या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे. या चित्रपटात भारतातील सर्वात वेदनादायक आणि विवादास्पद दुःखद घटनेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. धीरज सरना दिग्दर्शित या चित्रपटात 2002 मधील गोध्रा रेल्वे जळीत प्रकरणावर निर्भीडपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. या घटनेत साबरमती एक्सप्रेसमधील भीषण हिंसाचारात निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इतिहास कसा बदलला जाऊ शकतो, सत्य कसे लपवले जाऊ शकते आणि त्या बदलांचे परिणाम पिढ्यान् पिढ्या कसे उमटू शकतात, याची आठवण हा चित्रपट करून देतो. या चित्रपटात विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि ऋद्धी डोगरा यांनी या दमदार अभिनय केला आहे. अनेक नाट्यमय घाडमोडी असलेला हा चित्रपट न्याय, माध्यमांचा प्रभाव आणि सत्याची किंमत यासारख्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्यास प्रेक्षकांना भाग पाडतो. 

'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाची कथा

'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात गुजरातमध्ये 2002 मध्ये घडलेल्या गोध्रा ट्रेन जळीतकांडाचा शोध घेणाऱ्या समर कुमार या हाडाच्या पत्रकारांची गोष्ट सांगण्यात आली आहे. अनेकांचा बळी गेलेल्या या दुर्दैवी घटनेमागील अस्वस्थ करणारी सत्ये समोर येत असताना, समर एका धोकादायक कटकारस्थानाचा उलगडा करतो. या कटात प्रभावशाली व्यक्ती सामील आहेत आणि आपल्या गुपितांचे रक्षण करण्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत, हे तो दाखवून देतो. त्याचा हा शोध मणका राजपुरोहित थांबवते. पण काही वर्षांनी अमृता गिल या अजून एका रिपोर्टरला या छुप्या रिपोर्टचा छडा लागतो. सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी समरच्या शोध अहवलाची मदत घेत ते दोघे एकत्रितपणे भ्रष्टाचार आणि फसवणुकीच्या जाळ्याचा उलगडा करतात. हा कट उघड करण्यासाठी सत्याचा शोध घेत असताना त्यांना अनेक धमक्या येतात, धोक्यांना सामोरे जावे लागते. ही थराराची, धाडसाची, भ्रष्टाचाराची आणि न्यायाचा शोध घेण्याची गोष्ट आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ZEE5 वर 'या' दिवशी पाहता येणार प्रीमियर 

प्रेक्षकांनी 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला आणि खूप कौतुक केले. अशातच आता 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा प्रीमियर ZEE5 वर 10 जानेवारी रोजी होणार आहे. प्रेक्षक देखील या चित्रपटाच्या प्रीमियरची आतुरतेने वाट पाहत आहेत.