एअर होस्टेसवर सेल्फीसाठी जबरदस्ती, प्रवाशी अटकेत

एअर होस्टेसवर  सेल्फीसाठी जबरदस्ती करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.  दमन-मुंबई विमान प्रवासात ही घटना घडली. मोहम्मद अबुबाकरअसे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

Updated: Jun 28, 2016, 05:50 PM IST
एअर होस्टेसवर सेल्फीसाठी जबरदस्ती, प्रवाशी अटकेत title=

मुंबई : एअर होस्टेसवर  सेल्फीसाठी जबरदस्ती करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.  दमन-मुंबई विमान प्रवासात ही घटना घडली. मोहम्मद अबुबाकरअसे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

जेट एअरवेजच्या विमानाने गुजरातमधील दमन येथून मुंबईला येत होता, तेव्हा अबुबाकरने एअर होस्टेसच्या इच्छेविरुद्ध सेल्फी घेतली, त्यानंतर प्रसाधनगृहात जाऊन धुम्रपान करुन नियम मोडले. विमानाने मुंबई विमानतळावर लँण्ड केल्यानंतर अबुबाकरला अटक करण्यात आली. 
 
एअर होस्टेसच्या तक्रारीनुसार विमानात असताना अबु बाकरने तिचा हात पकडला व 'चलो ना यार एक सेल्फी लेते हैं' असे म्हटले. मी आक्षेप घेऊनही संपूर्ण प्रवासात त्याची माझ्याबरोबर गैरवर्तणूक सुरु होती. अबुबाकरने सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिने सरळ नकार दिला आणि आपल्या आसनावर बसली.  
 
पण अबुबाकर तिथून हलला नाही. तो तिच्या मागेच उभा होता. एअर होस्टेस आपल्या आसनावरुन उठलीय तेव्हा अबुबाकरने हद्दच केली. त्याने सरळ तिच्या दंडाला धरले आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु लागला. 

हवाई सुंदरीने आरडाओरडा केल्यानंतर केबिन क्रू चे सदस्य तिथे आले आणि त्यांनी सुटका केली. कलम ३५४ आणि ३३६ अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.