नवी दिल्ली : अंतराळातील दुनियेत ‘इस्रो’नं नवा इतिहास रचलाय. इस्रोचं मंगळयानाचं पहिलं पाऊल यशस्वी ठरलंय. इस्रोनं मंगळयानाच्या इंजिनचं यशस्वी परिक्षण केलंय. मंगळयानाच्या मेन लिक्विड इंजिनची टेस्ट यशस्वी झालीय. गेल्या 300 दिवसांपासून हे इंजिन बंद होतं.
मंगळयानाच्या या इंजिनला सुरु करून चार सेकंदांपर्यंत चालू ठेवलं गेलं. इस्रोनं सोशल वेबसाईट ‘ट्विटर’वरून या यशस्वी प्रयोगाची बातमी दिलीय. मंगळयान 24 सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थापित होईल.
मंगळयानाची गती हळू करणं हे या प्रयोगाचं उद्दीष्ट होतं. त्यामुळे आता हे यान मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाकडे आकर्षिला जाऊन त्याच्या कक्षेत जाऊन स्थिर होऊ शकेल.
मंगळ मिशन हे भारताचं पहिलंच आंतरग्रह मिशन आहे. हे मंगळ यान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या पोलर सॅटेलाईट लाँच व्हिकलच्या (पीएसएलव्ही) मदतीनं प्रक्षेपित करण्यात आलं होतं. हे मंगळ यान बुधवारी लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. ६६ कोटी ६० लाख कि.मी.च्या आपल्या प्रवासादरम्यान हे मंगळ अंतराळ यान १ डिसेंबर २०१३ रोजी पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या बाहेर पडलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.