नवी दिल्ली : मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्री आणि सध्या ट्विटरवर जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांच्यासोबत असा एक किस्सा घडला की तुम्हाला ही पोटधरुन हसायला येईल.
सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर सुषमा स्वराज या लोकांच्या समस्या सोडवण्यात आघाडीवर असल्याचं सध्या चित्र आहे. अशीच एक मदत त्यांच्याकडे एका व्यक्तीने मागितली. पण ती थोडी विचित्रच होती. त्यांच्याकडे एकाने फ्रिज खराब झाल्याने मदत मागितली. पल्ली वेंकट नावाच्या या व्यक्तीने ट्विटरवर सुषमा स्वराज आणि रामविलास पासवान यांना ही गोष्ट ट्विट केली.
एका कंपनीने त्यांना खराब फ्रिज दिलं. ती कंपनी या बदलण्यासाठी तयार नाही. यावर सुषमा स्वराज यांनी ही विनम्रतेसह खूपच छान ट्वीट केलं.
त्यांनी म्हटलं की, 'भाऊ मी रेफ्रिजरेटरशी संबंधित प्रकरणात कोणतीही मदत करु शकत नाही. मी संकटग्रस्त लोकांच्या मदतीत सध्या व्यस्त आहे.
यानंतर ट्विटरवर वेंकटवर लोकांनी ट्विट करण्यास सुरुवात केली. सुषमांच्या ट्विटची अनेकांनी स्तुती केली. वेंकट यांनी ही तक्रार ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली पाहिजे होती पण त्यांनी ही तक्रार सुषमा स्वराज यांच्याकडे केली.
Brother I cannot help you in matters of a Refrigerator. I am very busy with human beings in distress. https://t.co/cpC5cWBPcz
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) June 13, 2016