वायुसेनेच्या 'मिग-२१'ला अपघात, पायलट ठार

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात प्रशिक्षण दरम्यान सोमवारी एक विमान खाली उतरताना पायलटचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने त्याला अपघात झाला.

Updated: Jul 15, 2013, 02:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात प्रशिक्षणादरम्यान सोमवारी एका विमानाला अपघात झाला. या अपघातात पायलटचा मृत्यू झालाय.

मिग-२१ हे विमान खाली उतरवताना या विमानाला अपघात झाला. हवाईदलाचं प्रशिक्षण सुरु असताना हा अपघात घडलाय. मिग २१ (बाइसन) हे वायुसेनेचं लढाऊ विमान आहे.
सुरक्षा दलाकडून ही माहिती मिळाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय. या घटनेबाबत अद्याप संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळेच या दुर्घटनांमागची कारणे, यासंबधीच्या चौकशीचे आदेश सुरक्षादलाचे प्रवक्ते एस. डी. गोस्वामी यांनी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'ला दिले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.