मोदींकडून महाराष्ट्रातील या हॉटेल मालकाचं कौतुक

'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकोल्यातील मुरलीधर राऊत या हॉटेल व्यावसायिकाचं कौतुक केलं. नोटाबंदीमुळे प्रवाशांचे हाल झाले असताना बाळापूर मधील मुरलीधर राऊत यानं स्वत: च्या मराठा हॉटेलमध्ये सर्व ग्राहकांना भरपेट जेवण दिलं. 

Updated: Nov 27, 2016, 02:17 PM IST
मोदींकडून महाराष्ट्रातील या हॉटेल मालकाचं कौतुक title=

नवी दिल्ली : 'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकोल्यातील मुरलीधर राऊत या हॉटेल व्यावसायिकाचं कौतुक केलं. नोटाबंदीमुळे प्रवाशांचे हाल झाले असताना बाळापूर मधील मुरलीधर राऊत यानं स्वत: च्या मराठा हॉटेलमध्ये सर्व ग्राहकांना भरपेट जेवण दिलं. 

जुन्या नोटा असतील तरी भरपेट खा आणि बिलाचे पैसे पुढच्या प्रवासात कधीही आणून द्या. अशी सूट त्यांनी आपल्या ग्राहकांना हॉटेलात दिली. त्यांच्या या निर्णयाचं मोदींनी कौतुक केलं.

काही दिवसांपूर्वी 24taas.com ने ही बातमी दिली होती, प्रेक्षकांनीही या बातमीला भरभरून प्रतिसाद दिला होता. आज मोदींनी या हॉटेलचं कौतुक केलं आहे.