आरबीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, बँकांना दिले आदेश

रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने शनिवारी अचानक बँकांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांच्याकडे असलेली रक्कम जमा करावी. देशात नोटबंदीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रोज वेगवेगळे निर्णय सरकारक़डून घेतले जात आहेत. लोकांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून निर्णय घेण्यात येत आहेत. सरकारकडून ठोस उपाययोजन केल्या जात आहेत. 

Updated: Nov 27, 2016, 01:02 PM IST
आरबीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, बँकांना दिले आदेश title=

नवी दिल्ली : रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने शनिवारी अचानक बँकांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांच्याकडे असलेली रक्कम जमा करावी. देशात नोटबंदीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रोज वेगवेगळे निर्णय सरकारक़डून घेतले जात आहेत. लोकांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून निर्णय घेण्यात येत आहेत. सरकारकडून ठोस उपाययोजन केल्या जात आहेत. 

५०० आणि १००० च्या नोटांवर बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर लोकांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटा बँकेत जमा केले. बँकांनी देखील या बंदीनंतर त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटांचा काही भाग सरकारी बॉन्ड्समध्ये टाकला. त्यामुळे १० वर्ष जुना बॉन्ड यील्ड ५० अकांपेक्षा अधिकने घसरला. आणि सात वर्षातल्या सर्वात खालच्या स्तरावर येईन पोहोचला.

आरबीआयने म्हटलं की, बँकांना १६ सप्टेंबर पासून ते ११ नोव्हेबरमधली सर्व जमा रक्कम रिजर्व्ह रेशोच्या आधारे जमा करावी लागेल. ९ डिसेंबरच्या आधी त्याची चौकशी केली जाईल. ट्रेडर्सने आरबीआयच्या या निर्णयाला कठोर म्हटलं आहे. या बॉन्डच्या माध्यमातून मार्केटमध्ये आलेल्या तेजीवर अंकुश लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रेडर्सचं म्हणणं आहे. आरबीआयने नंतर थोडी नरमाईची भूमिका घेत मार्केट स्टॅबलाइजेशन बॉन्ड्सच्या विक्रीच्या माध्यमातून रिवर्स रिपोजनुसार बँकांना फंड सुरक्षित ठेवण्याचे आदेश देऊ शकतो.
 
आरबीआयच्या या निर्णयाने शेअर मार्केटचे आशा तुटतील. ७ डिसेंबरला व्याज दर २५ बेसिस पॉईंटने कमी होऊ शकते. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांमधून 3.24 लाख कोटी बाहेर निघतील.