मोटरमनने रेल्वे थांबवली आणि भाजी खरेदी केली

भाजी खरेदीसाठी कधी रेल्वे थांबवल्याचे तुम्ही ऐकले आहे का? शुक्रवारी संध्याकाळी चक्क मोटरमनने भाजी खरेदीसाठी इंटरसिटी एक्सप्रेस गंगाघाट रेल्वे क्रॅासींगवर थांबवली. 

Updated: Jul 12, 2015, 10:01 PM IST
मोटरमनने रेल्वे थांबवली आणि भाजी खरेदी केली title=

लखनऊ : भाजी खरेदीसाठी कधी रेल्वे थांबवल्याचे तुम्ही ऐकले आहे का? शुक्रवारी संध्याकाळी चक्क मोटरमनने भाजी खरेदीसाठी इंटरसिटी एक्सप्रेस गंगाघाट रेल्वे क्रॅासींगवर थांबवली. 

ही ट्रेन लखनऊहून आग्रा छावणीला जात होती. सिग्नल नसतांनाही ट्रेन थांबवल्यामुळे प्रवासी बेचैन झाले. इंजीनमध्ये बिघाड झाल्याचा संशय प्रवाशांना येऊ लागला. 

दरम्यान मोटरमनने क्रॅासिंगच्या पलिकडे जाऊन भाजी खरेदी केल्याचे प्रवाशांनी पाहिले. त्यानंतर ट्रेन कानपूरकडे रवाना होत असतांनाच क्रॅासिंगवरचे कर्मचारीही इंजीन बंद पडल्याच्या संशयाने मोटरमनजवळ पोहोचले. परंतू इंजिनामध्ये कोणताही बिघाड नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.