नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांचा एअर इंडिच्या कर्मचाऱ्याशी जो वाद झाला, त्या वादाला नवी कलाटणी मिळाली आहे. आतापर्यंत खासदार रवी गायकवाड यांच्यावर टीका होत होती. मात्र या व्हिडीओतील काही संवाद आणि वागणूक पाहिली तर खासदार सोडा, पण विमान प्रवाशाला अशी वागणूक मिळणे, अतिशय गंभीर बाब आहे.
ही संपूर्ण व्हिडीओ क्लिप लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना दाखवण्यात आली. यानंतर पुढील निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाला कलाटणी मिळाल्याने शिवसेना विमान कंपन्यांवर आणखी आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.
खासदार रवी गायकवाड यांनी मागून मारण्यात आलं आहे. याचवेळी 'इसको अंदर लेके मारते है, किसी को क्या पता चलेगा' असा संवाद एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे, यावर रवी गायकवाड म्हणताय, बडे बत्तमीज लोग है यहाँ पे...तर दुसरीकडे एअर इंडियाचा क्रू रवी गायकवाड यांच्यावर धावून गेल्यानंतर, महिला कर्मचारी मध्यस्थी करतेय, आणि रवी गायकवाड यांना समजावून दिलासा देण्याचा प्रयत्न करत माफी मागताना म्हणतेय, माझा सिनिअर वेडा आहे, कुणाला काय बोलावं ते त्याला कळतं नाही. म्हणजेच रवी गायकवाड यांना आक्षेपार्ह बोलल्यानंतर आणि मागून धक्काबुक्की केल्यानंतर ते संतापले आहेत.
ही सर्व व्हिडीओ क्लिप व्यवस्थित पाहिल्यानंतर हे लक्षात आले आहे, रवी गायकवाड यांनी देखील हे आधी सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण एअर इंडियाच्या एका महिला कर्मचाऱ्याने त्यांची समजूत घातली, यात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, अशा लोकांशी आपण भांडणं शोभत नाही, असं सांगताना व्हिडीओ व्हायरल झाल्याने रवी गायकवाड यांचं चूकलं आणि ते शांतपणे ऐकून घेत आहेत, असा मेसेज गेला.
शिवेसेनेचे खासदार रवी गायकवाड यांची चूक आहे किंवा नाही हे सिद्ध होण्याआधीच त्यांच्या विमान प्रवासावर बंदी टाकण्यात आली, विशेष म्हणजे फक्त एअर इंडिय़ाच नाही, तर सर्व विमान कंपन्यांनी एकच भूमिका घेतली. मात्र आता रवी गायकवाड यांनाच धक्काबुक्की आणि धमकीची भाषा झाली असेल, तर शिवसेना यावर आक्रमक होण्याची चिन्हं वाढली आहेत, त्यामुळे सर्वच विमान कंपन्यांची अडचण होणार असल्याचं दिसतंय.