योगाचा इस्लामला धोका : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

  हिंदू संस्कृतीचा इस्लामला धोका आहे, हे लक्षात घेऊन इमामांनी आता आंदोलन करण्यासाठी तयार राहा. शुक्रवारी नमाजासाठी मशिदीत येणाऱ्या लोकांना आंदोलनासाठी सज्ज केले पाहिजे, असे धक्कादायक पत्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने लिहिलेय.

PTI | Updated: Jun 23, 2015, 10:57 PM IST
योगाचा इस्लामला धोका : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड  title=

लखनऊ :  हिंदू संस्कृतीचा इस्लामला धोका आहे, हे लक्षात घेऊन इमामांनी आता आंदोलन करण्यासाठी तयार राहा. शुक्रवारी नमाजासाठी मशिदीत येणाऱ्या लोकांना आंदोलनासाठी सज्ज केले पाहिजे, असे धक्कादायक पत्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने लिहिलेय.

योग, सूर्य नमस्कार हे इस्लामविरोधी आहेत. हिंदू संस्कृतीचा इस्लामला धोका असल्याचा आरोप ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केलाय. देशातील सर्व मुस्लिम संघटनांना आवाहन करणारे पत्रच लिहिल्याने नवा वाद निर्माण झालाय.  

इस्लामला असलेला धोका लक्षात घेऊन इमामांनी आता पुढाकार घ्यायला हवा. शुक्रवारी नमाजासाठी मशिदीत येणाऱ्या लोकांना आंदोलनासाठी सज्ज केले पाहिजे, असेही या पत्रात नमूद  केले आहे.
 
रहमानी यांनी योगा आणि सूर्य नमस्कार करु नये, असे आवाहनही मुस्लिमांना केले आहे. सूर्य नमस्कार ही सूर्याची पूजा आहे. वैदिक परंपरा आणि ब्राह्मण धर्माशी निगडीत ही बाब आहे. त्यामुळे आपल्या धर्माशी त्याची सांगड घातली जाऊ शकत नाही, असा तर्कही रहमानी यांच्या पत्रात अधोरेखित करण्यात केलाय. 

ब्राह्मण, योग आणि सूर्य नमस्काराचा उदो उदो इस्लामिविरोधी असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. भारतीय संविधानानुसार सरकारने धर्मनिरपेक्ष असायला हवं आणि सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्य मिळायला हवं, असा टोलाही या पत्रातून केंद्राला लगावलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.