अमूल चॉकलेटच्या जाहिरातीत नीरजा भानोत

निडरपणे दहशतवादयांचा सामना करता प्राण गमावलेल्या नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित सोनम कपूरचा नीरजा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. 

Updated: Feb 21, 2016, 11:30 AM IST
अमूल चॉकलेटच्या जाहिरातीत नीरजा भानोत title=

मुंबई : निडरपणे दहशतवादयांचा सामना करता प्राण गमावलेल्या नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित सोनम कपूरचा नीरजा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. 

१९८६मध्ये दहशतवाद्यांनी हायजॅक केलेल्या विमानात नीरजाला दहशतवाद्यांनी ठार केले होते. त्या विमानातील ३५९ जणांचे प्राण वाचविताना नीरजाला मात्र स्वत:चे प्राण गमवावे लागले. नीरजाच्या या शूरतेबद्दल तिला भारत सरकारकडून मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कार देण्यात आला. 

काही दिवसांपूर्वीच नीरजाच्या विमानातील अखेरच्या अनाउंसमेंटचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर आता आता अमूलने ८० च्या दशकातील अमूल चॉकलेटच्या जाहिरातीचा व्हिडीओ जारी केलाय यात नीरजाने काम केले होते. 

नीरजाचा हा व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल.