आता वेटिंगचं टेंशन संपलं, प्रत्येकाला मिळणार कन्फर्म तिकीट

आता सणासुदींचे दिवस सुरू झाले आहेत आणि रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची कन्फर्म तिकीटसाठी तगमग सुरू झालीय. तत्काळ आणि प्रीमियम तत्काळमध्येही तिकीट मिळणं कठीण झालंय. अशात भारतीय रेल्वेकडून सर्व प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Updated: Oct 15, 2015, 04:35 PM IST
आता वेटिंगचं टेंशन संपलं, प्रत्येकाला मिळणार कन्फर्म तिकीट   title=

नवी दिल्ली: आता सणासुदींचे दिवस सुरू झाले आहेत आणि रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची कन्फर्म तिकीटसाठी तगमग सुरू झालीय. तत्काळ आणि प्रीमियम तत्काळमध्येही तिकीट मिळणं कठीण झालंय. अशात भारतीय रेल्वेकडून सर्व प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. 

नव्या व्यवस्थेअंतर्गत जर आपण तिकीट काढलेल्या ट्रेनचं कन्फर्म तिकीट मिळालं नाही. तर प्रवाशाला त्याच रूटनं जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणार आहे. ऑल्टर्नेटिव्ह ट्रेन्स अकोमोडेशन स्कीमच्या नावानं ही सुविधा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

आणखी वाचा - रेल्वे अपघात झाल्यास प्रवाशाला मिळणार भरपाई, एलआयसीबरोबर करार

नव्या बुकिंग नियमांतर्गत पर्यायी ट्रेनचं नाव देण्याची सुविधा देण्यात येईल. या सुविधेमुळं तिकीट बुक करतांना आपण ज्या कॅटॅगिरीत बुक करतोय त्याच कॅटेगिरीमध्ये पर्यायी ट्रेन्सची नावं देऊ शकता. जर आपलं तिकीट कन्फर्म झालं नाही तर पर्यायी ट्रेनमध्ये शिफ्ट केलं जाईल. यात बोर्डिंग स्टेशनची वेगळी निवड करण्याचंही ऑप्शन असेल.

या नियमांतर्गत रेल्वे स्पेशल ट्रेन्समध्येही लोकांचं तिकीट कन्फर्म करेल. यासाठी वेगळे अधिक पैसे मागितले जाणार नाहीत. एका प्रकारच्या मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्समध्ये हा नियम एकत्र लागू केला जाईल. मात्र बोर्डिंग स्टेशन बदलल्यास अधिकची रक्कम परत मिळणार नाही. 

आणखी वाचा - रेल्वेचं नवं वेळापत्रक आजपासून लागू, 90 गाड्यांच्या स्पीडमध्ये वाढ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.