सायकलीच्या दंगलीवर अजूनही तोडगा नाही

समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल चिन्हासाठी अखिलेश आणि मुलायमसिंहांच्या गटांनी निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद केला.

Updated: Jan 13, 2017, 10:38 PM IST
सायकलीच्या दंगलीवर अजूनही तोडगा नाही  title=

नवी दिल्ली : समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल चिन्हासाठी अखिलेश आणि मुलायमसिंहांच्या गटांनी निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद केला. दोन्ही गटांची बाजू निवडणूक आयोगानं ऐकून घेतली.  मात्र सायकल चिन्ह कुणाचं याचा फैसला निवडणूक आयोगानं राखून ठेवलाय.  

मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्या गटाने निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव या दोघांकडून सायकल या निवडणूक चिन्हावर दावा करण्यात आलाय.  

गेल्याच आठवड्यात अखिलेश यादव गटाचे रामगोपाल यांनी निवडणूक आयोगकडे  दोनशेहून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचं प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर केलंय.