यूपीएससी मेरिटमधून इंग्रजीचे गुण बाहेर

यूपीएससी पूर्वपरीक्षेतील सी-सॅटचा पेपर रद्द होणार नाही, तसेच मेरीटमध्ये इंग्रजीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत, असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी

Updated: Aug 4, 2014, 09:31 PM IST
यूपीएससी मेरिटमधून इंग्रजीचे गुण बाहेर title=

नवी दिल्ली : यूपीएससी पूर्वपरीक्षेतील सी-सॅटचा पेपर रद्द होणार नाही, तसेच मेरीटमध्ये इंग्रजीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत, असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी
लोकसभेत बोलतांना स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 2011 मधील अपात्र विद्यार्थ्यांना 2015 मध्ये आणखी एकदा संधी मिळणार आहे.

सीसॅटच्या मुद्द्यावर यापूर्वी विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी नसल्याचं सांगत विरोधकांनी राज्यसभेत गदरोळ केला. मात्र सरकारने पेपर रद्द करण्याची मागणी फेटाळत त्याचे गुण मेरिटमध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत, असं स्पष्ट केलं आहे.

यूपीएससीची 24 ऑगस्टला होणारा सी सॅटचा पेपर रद्द करण्याची मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केली होती. सी सॅट या विषयामुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचा आरोप हिंदी तसेच इतर भाषेतील विद्यार्थ्यांचा होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.