नवी दिल्ली : घरवापसीसाठी काश्मिरी पंडितांपुढे कोणीही भीकेचा कटोरा घेऊन जाणार नाही आणि हात जोडणार नाही, काश्मीरमध्ये परतण्याचं पहिलं पाऊल तुम्हालाच उचलावं लागेल, असं वक्तव्य जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केलंय.
दिल्लीत स्थायिक झालेल्या काश्मिरी पंडितांना परत बोलावलं पण मुलांचं शिक्षण आणि आई वडिलांच्या उपचाराची कारणं सांगून काही अधिकारी आणि डॉक्टरांनी घरवापसीला नकार दिला, त्यामुळे आता तुमचा हात पकडून कोणी आग्रह करेल अशी अपेक्षा ठेवू नका असंही अब्दुल्ला म्हणालेत.
परतीचं पाऊल उचला, पहिलं पाऊल जड जाईल पण ते कधी ना कधी टाकावंच लागेल, ते तुम्हालाच टाकायचं आहे, असा सल्ला अब्दुल्लांनी दिलाय.
काश्मिरी पंडितांच्या व्यथांवर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिल्लीत पार पडला, त्या कार्यक्रमात बोलताना फारुक अब्दुल्लांनी काश्मिरी पंडितांविषयी हे वक्तव्य केलं.