दहशतवादी नावेदचा खळबळजनक खुलासा

उधमपूरमध्ये बीएसएफच्या जवानांवर हल्ला केल्यानंतर गावकऱ्यांनी पकडलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब आता काही खळबळजनक खुलासे करत आहेत. नावेदने सुरक्षा यंत्रणांसमोर असे काही खुलासे केले की त्याने सिद्ध होते की, या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे. 

Updated: Aug 7, 2015, 03:10 PM IST
दहशतवादी नावेदचा खळबळजनक खुलासा title=

जम्मू  : उधमपूरमध्ये बीएसएफच्या जवानांवर हल्ला केल्यानंतर गावकऱ्यांनी पकडलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब आता काही खळबळजनक खुलासे करत आहेत. नावेदने सुरक्षा यंत्रणांसमोर असे काही खुलासे केले की त्याने सिद्ध होते की, या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे. 

 
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी नावेद दावा केला की पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे राहणारा आहे. त्याचा साथीदार नोमान उर्फ मोमिन हा बीएसएफच्या गोळीबारात ठार झाला. नोमान हा जमात-उद-दावा चा प्रमुख आणि मुंबईत २६/११चा मास्टर माइंड हाफिज सईद याचा खासगी सिक्युरिटी गार्ड असल्याचे नावेदने उघड केले आहे. 
 
 नोमानसह चार दहशतवाद्यांनी हा प्लॅन बनवला होता. ४ दहशतवाद्यांमध्ये एक गाईडही सामिल होता. चारही दहशतवादी कुपवाडात काही दिवस थांबले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.