स्काईपचा वापर करुन रचला दहशतवादी हल्ल्याचा कट

कोलकाता इथं तुरुंगात असलेल्या दोघा संशयित दहशतवाद्यांनी स्काईप या सॉफ्टवेअरचा वापर करुन पाकिस्तानमधील सूत्रधारांसोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत तुरुंग प्रशासन पूर्णतः अनभिज्ञ होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं तुरुंग प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र या वृत्तामुळं तुरुंगातील अनागोंदी कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. 

Updated: Aug 17, 2014, 07:52 PM IST
स्काईपचा वापर करुन रचला दहशतवादी हल्ल्याचा कट title=

नवी दिल्ली: कोलकाता इथं तुरुंगात असलेल्या दोघा संशयित दहशतवाद्यांनी स्काईप या सॉफ्टवेअरचा वापर करुन पाकिस्तानमधील सूत्रधारांसोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत तुरुंग प्रशासन पूर्णतः अनभिज्ञ होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं तुरुंग प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र या वृत्तामुळं तुरुंगातील अनागोंदी कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. 

लष्कर-ए-तोयबाचे संशयित दहशतवादी अर्शद खान आणि शौकत हे सध्या कोलकाता इथल्या अलीपूर तुरुंगात आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला तपासादरम्यान हे दोघं दहशतवादी तुरुंगात स्मार्टफोन वापरत असल्याचं उघड झालं. या दोघांच्या स्मार्टफोनवर स्काईप हे व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरलं जाणारं सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहेत.

स्काईपच्या आधारे हे दोघं दहशतवादी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांशी संपर्क साधत होते. हे दोघंही तुरुंगात बसून दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते असंही समोर आलंय. मोबाईलवरुन थेट फोन केल्यास दोघंही लगेच पकडले गेले असते. मात्र स्काईपद्वारे व्हिडिओ कॉलिंग केल्यास ते ट्रेस करणं कठीण असते. स्काईपचे आयपी कोड डिकोड करणं कठीण असतं. याचा फायदा घेत त्यांनी स्काईपचा वापर केला. 

मात्र त्यांची ही चलाखी दिल्ली पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांनी जेल प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी तुरुंगप्रशासनाला पत्र पाठवून या दोघा दहशतवाद्यांवर विशेष लक्ष देण्यास सांगितलंय. या दोघांच्या सुरक्षेव्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. कोलकाताप्रमाणंच दिल्लीतील तिहार तुरुंगातील दहशतवादीही स्मार्टफोन वापरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.