मुंबई : रेल्वेकडून ई-बेडरोल सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेचा प्रवास आणखी आरामदायी व्हावा, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून सोमवारी ई-बेडरोल सेवा सुरू करण्यात आली. मात्र यासाठी रेल्वे प्रवाशाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
दोन सुती चादर, एक उशी आणि एक रजई २५० रुपयांमध्ये या सेवेच्या माध्यमातून स्लीपर आणि अनारक्षित डब्यांमध्ये देण्यात येणार आहे.
तिकीट बुकिंग करताना किंवा ट्रेन सुटण्यापूर्वी ई-बेडरोल सेवेचा वापर करता येईल. आयआरसीटीसीने रेल्वे स्थानकांवर ई-हब स्थापन केले आहे. या ई-हबमध्ये ई-कॅटरिंग, ई-बेडरोल आणि रिटायरिंग रुमची सुविधा पुरवली जाणार आहे.ही सेवा आयआरसीटीसीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.