'आयडीबीआय', 'पीएनबी'च्या होमलोन व्याजदरात कपात

काही बड्या बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर आता आयडीबीआय तसेच पंजाब नॅशनल बॅंकेने होमलोनच्या व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली. दोन्ही बँकांनी व्याजदरात दरामध्ये ०.२५ टक्के कपात केली आहे. 

Updated: May 7, 2015, 06:23 PM IST
'आयडीबीआय', 'पीएनबी'च्या होमलोन व्याजदरात कपात title=

नवी दिल्ली : काही बड्या बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर आता आयडीबीआय तसेच पंजाब नॅशनल बॅंकेने होमलोनच्या व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली. दोन्ही बँकांनी व्याजदरात दरामध्ये ०.२५ टक्के कपात केली आहे. 

आयडीबीआय बॅंकेने किमान कर्ज दर-  बेस लेंडिंग रेट  ०.२५ टक्‍क्‍यांनी कमी करून १० टक्के इतका केला आहे. त्यामुळे आयडीबीआय बॅंकेच्या गृहकर्जाचा मासिक हप्ता कमी होणार आहे. 

हे दर ११  मे पासून लागू करण्यात येणार आहेत. पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) देखील आजपासून (गुरुवार) गृहकर्जाच्या दरात कपात केली आहे. 

बॅंकेने किमान कर्जदर (बेस लेंडिंग रेट) ०.२५  टक्‍क्‍यांनी कमी करून १०  टक्के इतका केला आहे. बुधवारी बॅंक ऑफ बडोदानेही गृहकर्जाच्या दरात कपात केली आहे. यापूर्वी स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि ऍक्‍सिस बॅंक यांनीही आपल्या गृहकर्जाच्या दरात कपात केली आहे. 

देशातील प्रमुख बॅंकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गृहकर्जदारांच्या कर्जाचा मासिक हप्ता कमी होऊन दिलासा मिळणार आहे. इतरही काही बॅंका आगामी काळात व्याजदरांत कपात करण्याची शक्‍यता आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने आपल्या रेपो दरांत दोनवेळा कपात केल्यानंतरही बॅंका त्यांच्या ग्राहकांना फायदा देत नसल्याबद्दल रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही बँका व्याजदर कपात करण्यासाठी पुढे आल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.