दिल्लीत पुन्हा एकदा ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू

राजधानी दिल्लीमध्ये आजपासून पुन्हा एकदा ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू करण्यात आलाय.

Updated: Apr 15, 2016, 09:07 AM IST
दिल्लीत पुन्हा एकदा ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये आजपासून पुन्हा एकदा ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू करण्यात आलाय.

या काळात गाडीच्या नंबरनुसार सम आणि विषम तारखांना कार रस्त्यावर आणता येणार आहेत. याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी तब्बल दोन हजार ट्राफीक पोलीस, ५८० अधिकारी आणि पाच हजार नागरी सुरक्षा स्वयंसेवक तैनात करण्यात आलेत.

गर्दी टाळण्यासाठी मेट्रो आणि बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. रविवारी ऑड-इव्हनची अट लागू नसेल. 

१ ते १५ जानेवारीला हाच प्रयोग करण्यात आला होता... उल्लेखनीय म्हणजे, त्यावेळी हाती आलेल्या निष्कर्षांमध्ये प्रदूषणाच्या पातळीत फरक पडला नसल्याचंच समोर आलं होतं...

असं असलं तरी त्या काळात वाहतूक कोंडीची समस्या जाणवली नसल्याचा दावा करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऑड-इव्हनचं जोरदार समर्थन केलंय.