तलाक.. तलाक..तलाकला मुस्लिम महिलांचा विरोध

घटस्फोट. कोणाच्याही आयुष्यात वादळ आणणारा शब्द, मुस्लिम समुदायात तर तलाक हा शब्द ३ वेळा उच्चारल्यानं एखादं कुटुंब उद्धवस्त होण्यास पुरं पडतो... त्यामुळे फक्त तलाक उच्चारल्यानंच घटस्फोट होणं याला मुस्लिम महिलांनीच विरोध केलाय.

Updated: Aug 21, 2015, 04:40 PM IST
तलाक.. तलाक..तलाकला मुस्लिम महिलांचा विरोध title=

नवी दिल्ली : घटस्फोट. कोणाच्याही आयुष्यात वादळ आणणारा शब्द, मुस्लिम समुदायात तर तलाक हा शब्द ३ वेळा उच्चारल्यानं एखादं कुटुंब उद्धवस्त होण्यास पुरं पडतो... त्यामुळे फक्त तलाक उच्चारल्यानंच घटस्फोट होणं याला मुस्लिम महिलांनीच विरोध केलाय.

तलाक तलाक तलाक. नवऱ्यानं हा शब्द तीन वेळा उच्चारला तर एका मुस्लिम महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. केवळ तोंडानं शब्द उच्चारून बायकोला घटस्फोट देण्याची सुविधा मुस्लिम पर्सनल लॉमध्ये आहे. आता तर सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे स्काईप, ईमेल किंवा अगदी एसएमएस-व्हॉट्स अॅपवरही 'तलाक' दिला जातोय.

मात्र या प्रथेला मुस्लिम महिलांची अजिबातच मान्यता नसल्याचं समोर आलंय. पाच-पन्नास नव्हे, तर तब्बल ९२ टक्के महिलांनी ही पद्धत अतिशय अयोग्य असल्याचं म्हटलंय. मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आलीये. 

महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, ओडिसा, बिहार या १० राज्यांत हे सर्वेक्षण करण्यात आला. यात ४७१० महिलांनी सहभाग घेतला होता.

- यापैकी ९२.१% महिला एकतर्फी घटस्फोटाच्या विरोधात 
- तर ९१७% महिला या बहुपत्नीत्वाच्या विरोधात असल्याचं समोर आलंय...
- ७३% गरीब कुटुंबातल्या महिला तर 
- ५५% महिलांचा १८ वर्षांच्या होण्यापूर्वीच 'निकाह' झाला होता...
- ८२% महिलांच्या नावानं कोणतीही मालमत्ता नाही.

इंटरनेटमुळे जग जवळ आलंय. सर्वच धर्मांमधल्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती पथावर चालतायत. असं असताना मुस्लिम पर्सनल लॉमधल्या या अन्यायकारक पद्धतीविरुद्ध मुस्लिम महिलांच्या मतांचा आदर केला जावा, ही अपेक्षा चुकीची नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.