पंतप्रधान मोदींची देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर उत्तरे

इंग्रजी वृत्तवाहिनी टाईम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर उत्तरं दिली. काळा पैसा, भारताची विदेशातील प्रतिमा, पाकिस्तानच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Updated: Jun 27, 2016, 08:48 PM IST
पंतप्रधान मोदींची देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर उत्तरे

नवी दिल्ली : इंग्रजी वृत्तवाहिनी टाईम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर उत्तरं दिली. काळा पैसा, भारताची विदेशातील प्रतिमा, पाकिस्तानच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली.

किनाऱ्यावर बसून लाटा पाहण्याचे भारताचे दिवस आता गेले. आता भारत स्वत:चं जहाज घेवून समुद्रात उतरला आहे आणि स्वत:चा मार्ग तयार करतोय. असं देखील पंतप्रधान म्हणाले.

पाकिस्तान आणि दहशतवादाचा मुद्दा

अमेरिका भारताने सांगितलेल्या गोष्टींवर विचार करतो. पाकिस्तानच्या मुद्द्यावर देखील अमेरिका दखल देतो. भारताला समोरच्या देशांसोबत मैत्री हवी आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही देश गरीबीच्या विरोधात लढत आहे. दोन्ही देशांनी एकत्र गरीबीविरोधात लढण्याची गरज आहे. पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी ताकद काम करतायंत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट मैत्रीसाठी पण देशाच्या हितांसोबत कॉम्परमाईज नाही. टेबलवर जसं जोरात काम होतं सीमेवरही तसंच काम होईल. जवान उत्तर देत राहतील. त्यांना पूर्ण सूट आहे. जवान जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करतायंत. पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी शक्ती काम करतायंत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट मैत्रीसाठी पण देशाच्या हितांसोबत कॉम्परमाईज नाही. भारताची भूमिका मला जगाला सांगण्याची आता गरज नाही आहे. जगाला भारताची भूमिका दिसतेय. भारत दहशतवादाच्या विरोधात आहे.

महागाईपासून पळू नये 

जनधन योजनेमुळे गरीबांनाही वाटतंय की ते देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. महागाईपासून पळू नये. महागाईचं सत्य स्विकारलं पाहिजे. 2 वर्षापासून देशात दुष्काळ आहे. याचा परिणाम भाज्या आणि अन्न धान्यांवर होतो. शिवाय निर्यातही करावं लागतो. महागाई वाढण्याच्या गतीचं प्रमाण कमी झालं आहे. मागच्या काही वर्षाच्य़ा तुलनेत डाळीचं उत्पादन कमी झालं आहे आणि इतर देशातून आयात करण्याचाही प्रयत्न सुरु आहे.

रघुराम राजन यांचा मुद्दा

नवं सरकार रघुराम राजन काढून टाकेल अशा चर्चा आहेत. त्यांनी त्याचं कार्यकाळ पूर्ण केला आहे. रघुराम राजन यांच्याबाजूने बोलणारे त्यांच्यावर अन्याय करतायंत. पदावर असतांनाच देशाची सेवा होऊ शकते असं नाही. ते देशभक्त आहेत. कोणत्याही पदावर राजन हे चांगलं काम करु शकतात.

काळा पैसा

काळा पैशाने इतकं गंभीर रुप का घेतलं याचं मुळ आधी समजून घेतलं पाहिजे. संसदेत नेहमी या गोष्टीला टाळलं गेलं. सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतरही मागच्या सरकारने हा मुद्दा टाळला. 2012 ते 14 दरम्यान यावर निर्णय घेतलं नाही त्यामुळे अशा लोकांना काळा पैसा लपवण्यात आणखी वेळ मिळाला. सरकारमध्ये आल्यानंतर कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय एसआयटी बनवण्याचा घेतला. जी20 मध्ये पहिल्यांदा जगातील लोकांना भेटलो आणि तेव्हा हा मुद्दा आणखी गंभीर झाला. स्वीत्झर्लंडची चर्चा सुरु आहे. भारतातून काळा पैसा बाहेर जावू नये म्हणूनही प्रयत्न सुरु आहेत.

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा

देशात अनेक गोष्टी आणि प्रकरणं गुंतागुंतीची आहेत. काळा धंदा करणारे हुशार लोकं आहेत आणि याला अनेक मोठ्या नेत्यांनी मदत केली असावी. कोणालाही टार्गेट करुन कारवाई नाही केली जात आहे. दोषींवर कारवाई होईल.

संसदेचं स्पिरीट जपणं महत्त्वाचं

संसदेत चर्चा होणं गरजेचं आहे. हा लोकशाहीचा भाग आहे. संसद विरोध व्यक्त करण्यासाठी आहे. संसदेचं स्पिरीट जपण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येक गोष्टीवर आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेत असेही लोकं आहेत जे भाजपसोबत नाही पण सरकारच्या निर्णयांसोबत आहेत. प्रत्येकाला विरोधी पक्ष म्हणणं चुकीचं आहे. काँग्रेस पक्ष ज्यांनी ऐवढी वर्ष सत्तेत काढली आहे त्यांची संसदेतील वागणूक चुकीची आहे. जीएसटी पास न होणं हे गरीबांचं नुकसान आहे. राज्यसभेतील प्रतिनिधींनी हे समजून घेतलं पाहिजे. अनेक पक्ष याच्या समर्थनात आहेत फक्त एकच पक्ष याच्याविरोधात आहे. 

निवडणुकीत विकासाचाच मुद्दा

विकासाच्या मुद्दयावर निवडणुका लढवणार. लोकांना शिक्षण, सुविधा दिल्यास तणाव ही कमी होईल. देशात विकासाचं राजकारण झालं पाहिजे. देशाने विकासाच्या मुद्द्यावर पुढे गेलं पाहिजे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांकडे जास्त लक्ष देऊ नये. माध्यमांनी अशा लोकांना हिरो बनवू नये. एकत्र निवडणुकांच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. सगळ्या पक्षांना विश्वासात घेवून आयोगाने हा निर्णय घ्यावा.

सध्याची महत्त्वाची समस्या ?

पाण्याच्या नियोजनावर अधिक लक्ष देतोय. यावर्षी सगळ्याच राज्यांनी पाण्याच्या नियोजनावर चांगलं काम केलं आहे. महाराष्ट्रात जूनमध्ये पाऊस येतो म्हणून शेतकरी त्याहिशोबाने पेरणी करतो पण समजा पाऊस ऑगस्ट मध्ये आला तर...? यामुळे शेतकऱ्याला नुकसान होता कामा नये. यासाठी आम्ही 'फसल विमा' योजना आणली आहे.

पुढच्या 3 वर्षात काय लक्ष आहे ?

कितीही गती वाढवली तर समाधानी होत नाही. जग खूप पुढे निघून गेलं आहे. आपल्याला ही पळावं लागणार आहे. त्यामुळे काम करतोय. मोठा देश आहे त्यामुळे काम ही मोठं केलं पाहिजे. 2 वर्षात इतर अधिकाऱ्यांनाही सवय झाली आहे. 

कामची प्रेरणा कुठून मिळते ?

मी चिंता कधीच करत बसत नाही. आव्हानांना आव्हान दिलं पाहिजे. त्याची चिंता करत बसू नये. देशाला असंच सोडणार नाही.  पुण्यातील एक रिटारर्ड शिक्षक चंद्रकांत कुलकर्णी स्वत:ची पेंशन देवून देशासाठी ऐवढा विचार करतो तर मी तर पंतप्रधान आहे मला किती काम केलं पाहिजे. अशाच लोकांकडून प्रेरणा मिळते.