नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयावरुन लोकसभा आणि राज्यसभेत सुरुअसलेल्या गोंधळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
जवळपास ४५ मिनिटांच्या या बैठकीत पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर घेण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती राष्ट्रपतींना दिली.
राष्ट्रपतींनी या निर्णयाचं कौतुक केलंय. शिवाय यावर अधिक काम करण्याची गरज असल्याचं म्हटलंय.
'मी स्वतः अर्थ मंत्रालयाचं काम पाहिलं असल्यानं अशा निर्णयाचे परिणाम लगेच दिसत नाहीत त्यासाठी थोटी वाट पहावी लागते' अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती मुखर्जी यांनी व्यक्त केलीय.