नवी दिल्ली: केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आलीये.
पॉर्नहब, ब्रेझर्स, रेडट्यूब, बँग ब्रदर्स यासारख्या पॉर्नविश्वात चवीनं पाहिल्या जाणाऱ्या साइट्स भारतात ब्लॉक झाल्या आहेत. या साइट्स ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास 'सक्षम अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार ही साइट ब्लॉक करण्यात आली आहे', असा संदेश स्क्रीनवर झळकत आहे.
ट्विटरवर #पॉर्न_बॅन हा टॅग अचानक ट्रेण्डमध्ये आल्यानं पॉर्न साइटबंदी उजेडात आली आहे. एमटीएनएल, बीएसएनएल आणि एसीटी सर्विस प्रोव्हायडर्सचा नेट पॅक वापरत असलेल्या इंटरनेट युजर्सकडे या साइट ब्लॉक झाल्या आहेत.
पॉर्नसाइट बंदीबाबत सुप्रीम कोर्टानं अलिकडेच एक महत्त्वाची टिपण्णी केलेली आहे. चार भींतीच्या आत म्हणजेच घरात जर कुणी पॉर्न साइट बघत असेल तर त्यावर बंदी घालण्याचा आदेश कोर्ट देऊ शकत नाही. तो वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा ठरेल, असं मत सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी नोंदवलं होतं.
एका जनहित याचिकेवर सरन्यायाधीशांनी ही टिपण्णी केली होती. मात्र त्यानंतर आता अचानकपणे अनेक पॉर्न साइट्स ब्लॉक करण्यात आल्याची बाब उघड झाल्यानं त्याचे अनेक तर्क लावले जात आहेत.
दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पॉर्न साईट्स बंद केल्याचा निषेध केला आहे. ट्विटरवरून त्यांनी टीका केली.
To deprive consenting adults of the harmless fun they ar having of watching porn is equivalent of what Taliban nd Isis is doing to freedom
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 1, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.